बीड

बीड जिल्ह्यात आज 38 पॉझिटिव्ह:राज्यात 2681 तर देशात 22431 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 8 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1706 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 38 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1668 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 7 आष्टी 13 बीड 3 धारूर 1 केज 3 माजलगाव 4 परळी 2 पाटोदा 3 शिरूर 2 असे रुग्ण आढळून आले आहेत

गेल्या 24 तासांत राज्यात 2 हजार 681 नवीन रुग्णांचे निदान

राज्यात करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच मृत्यूंची संख्या देखील कमी झाल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली असून राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही किंचित वाढली असल्याने हे काहीसे चिंताजनक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात राज्यात 2 हजार 681 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात एकूण 2 हजार 413 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आज राज्यात झालेल्या 49 रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर 2.12 टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण 63 लाख 94 हजार 075 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के इतके झाले आहे.
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 33 हजार 397 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत देशात 22 हजार 431 रुग्णांची नोंद

देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव काहीसा आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत 22 हजार 431 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 318 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा घटला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल 24 हजार 602 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 44 हजार 198 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाच्या तीन कोटी 38 लाख 94 हजार 312 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी आतापर्यंत चार लाख 49 हजार 856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत 3 कोटी 32 लाख 258 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *