बीड

बीड जिल्ह्यात आज 17 पॉझिटिव्ह:राज्यात 2876 तर देशात 18833 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 7 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1915 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 17 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1898 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 7 बीड 3 गेवराई 1 केज 2 माजलगाव 1 परळी 1 पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात २ हजार ८७६ नवे करोनाबाधित सापडले

गेल्या काही दिवसांमध्ये करोनाचे रुग्ण कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर अशा मागण्या जोर धरत असताना दुसरीकडे करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या देखील कमी झालेली दिसून येत होती. मात्र, बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात ९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आज नोंद झालेल्या ९० मृत्यूंमुळे राज्यातील एकूण करोना मृतांचा आकडा आता १ लाख ३९ हजार ३६२ इतका झाला आहे. तसेच, मृत्यूदर देखील २.१२ टक्क्यांवर गेला आहे.

दरम्यान, आज दिवसभरात एकूण २ हजार ८७६ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत करोनाची बाधा झालेल्या लोकांची संख्या ६५ लाख ६७ हजार ७९१ इतकी झाली आहे. त्यापैकी ३३ हजार १८१ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आजपर्यंत राज्यात ६३ लाख ९१ हजार ६६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९७.३२ टक्क्यांवर गेला आहे. प्रशासकीय यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

देशात काल दिवसभरात 18,833 कोरोनाबाधितांची नोंद

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 18,833 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात 24770 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या सगळ्यात विशेष गोष्ट म्हणेज देशातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच लाखांहून कमी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ही मागील 203 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. त्याचबरोबर आतापर्यंत देशात तीन कोटी 38 लाख 71 हजार 881 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 49 हजार 538 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 31 लाख 75 हजार 665 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *