बीड जिल्ह्यात आज 22 पॉझिटिव्ह:राज्यात 2401 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 6 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1976 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 22 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1954 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 6 बीड 4 गेवराई 4 माजलगाव 3 पाटोदा 2 वडवणी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत
जिल्ह्यात 266 ऍक्टिव्ह रुग्ण
बीड जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 266 असून काल मंगळवारी 22 जण कोरोना मुक्त झाले आहेत,आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 866 बाधित संख्या झाली असून 99 हजार 826 जण कोरोनामुक्त झाले आहेत,जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.4 %असून आतापर्यंत 2 हजार 774 जण दगावले आहेत,जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्ह रेट 2.3%आहे तर डेथ रेट 2.79% आहे
राज्यात २,४०१ नव्या रुग्णांचे निदान
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही कमी झाली असून मृतांच्या सख्येतही घट झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत काल बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्या वाढल्याने आज राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात राज्यात २ हजार ४०१ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या २ हजार ०२६ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण २ हजार ८४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, आज ३९ रुग्णांचा मृत्यू झाला.
काल राज्यात झालेल्या ३९ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजार १५९ इतकी आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)