बीड जिल्ह्यात आज 28 पॉझिटिव्ह:राज्यात 2026 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 5 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1219 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 28 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1191 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 4 बीड 7 धारूर 1 गेवराई 5 केज 3 माजलगाव 2 परळी 3 शिरूर 2 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात २ हजार ०२६ नवीन रुग्णांचे निदान
राज्यात करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही कमी झाली असून मृतांच्या सख्येतही घट झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्या वाढल्याने काल राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,काल दिवसभरात राज्यात २ हजार ०२६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या २ हजार ६९२ इतकी होती. तर दिवसभरात एकूण ५ हजार ३८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,काल २६ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात झालेल्या २६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ८६ हजार ०५९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३१ टक्के इतके झाले आहे.
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजार ६३७ इतकी आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)