बीड जिल्ह्यात आज 17 पॉझिटिव्ह तर 306 ऍक्टिव्ह रुग्ण:राज्यात 2692 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 4 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1103 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 17 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1086 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 2 बीड 5 धारूर 1 गेवराई 1 परळी 1 पाटोदा 1 शिरूर 3 असे रुग्ण आढळून आले आहेत
जिल्ह्यात 306 ऍक्टिव्ह रुग्ण
बीड जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 306 असून रविवारी 23 जण कोरोना मुक्त झाले आहेत,आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 821 बाधित संख्या झाली असून 99 हजार 743 जण कोरोनामुक्त झाले आहेत,जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97 %असून आतापर्यंत 2 हजार 772 जण दगावले आहेत,जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्ह रेट 1.09%आहे
राज्यात २ हजार ६९२ नवीन करोनाबाधित
राज्यात काल दिवसभरात २ हजार ७१६ रुग्ण करोनामधून बरे झाले असून, २ हजार ६९२ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, ४१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,८०,६७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२८ टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६५,५९,३४९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३९२०७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)