बीड जिल्ह्यात आज फक्त 22 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 2696 तर देशात 22842 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 3 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2020 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 22 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1998 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 8 बीड 5 केज 1 गेवराई 1 पाटोदा 6 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात काल 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात काल 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 49 रुग्णांचा मृत्यू झाला. काल राज्यात 3 हजार 062 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 77 हजार 954 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे.मुंबईत गेल्या 24 तासात 405 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 495 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शनिवारी देशात 22 हजार 842 नव्या रुग्णांची भर
Coronavirus Updates : गेल्या दोन दिवसांमध्ये वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येनंतर आज त्यामध्ये काहीशी घट झाल्याचं पहायला मिळतंय.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात 22 हजार 842 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 244 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 25 हजार 930 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधी शुक्रवारी देशात 24 हजार 354 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 234 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता.
देशामधील सक्रिय रुग्णसंख्या ही गेल्या 199 दिवसांतील सर्वात कमी झाली असून ती सध्या दोन लाख 70 हजार 557 इतकी आहे. देशात आतापर्यंत एकूण तीन कोटी 30 लाख 94 हजार 529 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर एकूण चार लाख 48 हजार 817 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)