बीड

बीड जिल्ह्यात आज 48 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3063 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 1 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2353 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 48 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2305 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 6 आष्टी 6 बीड 12 गेवराई 2 केज 1 माजलगाव 3 पाटोदा 12, शिरूर 2,असे रुग्ण आढळून आले आहेत

coronavirus updates करोना: राज्यात आज ३ हजारांवर नवे रुग्ण

मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट झाली आहे. तसेच राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही थोडी कमी झाली आहे. मात्र, असे असले तरी आज करोना बाधित मृतांच्या सख्येत वाढ झाल्याने स्थिती चिंताजनक आहे. तसेच कालच्या तुलनेत आज बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ०६३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार १८७ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार १९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार २५३ इतकी होती. तर, आज ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४९ इतकी होती.

आज राज्यात झालेल्या ५६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ७१ हजार ७२८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के इतके झाले आहे.राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार ४८४ इतकी आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *