ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही-मुनगंटीवार
मुंबई-ठाकरे सरकार करोना संकट हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी केली होती. सोमवारी संध्याकाळी नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली त्या दरम्यान त्यांनी ही मागणी केली. करोना संकटाचा सामना करण्यास ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा असं ते म्हणाले होते. त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. परंतु ही मागणी पक्षाची अधिकृत भूमिका नसून त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याची माहिती माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.