बीड,दि.30 (जि.मा.का.):- पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी शासन निर्णयान्वये शासकीय निमशासकीय सेवेतील महारष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क पदावरील सरळसेवेने करावयाच्या नियुक्तीसाठी 10 टक्के संमातर आरक्षण देण्यात आले असून पदवीधर अशंकालीन उेमदवारांना शासकीय सेवेत नोकरीसाठी वयोमर्यादा 55 वर्षे इतकी करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी कळविले आहे.
पदवीधर पदवीधारक उमदवारांना बाह्ययंत्रणेव्दारे नियुक्त्यामध्ये वैयक्तीकरित्या प्राधान्याने नेमणूक देण्याबाबत कार्यपध्दती व मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. शासन निर्णयाच्या आदेशाचे पालन होत नसून प्रभावी अमलबजावणी होत नसल्याचे दिसुन आले आहे. पदवीधर पदवीधारक उमेदवारांच्या नेमणूकांचे प्रश्न निकाली निघत नसल्याने बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार संबधितांनी वक्यतीश लक्ष घालून शासन निर्णयातील कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचनेनुसार अंशकालीन उमेदवारांच्या नेमणुकींना प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
Like this:
Like Loading...
Related