बीड,दि.30 (जि.मा.का.):-परिवहन आयुक्त महराष्ट्र राज्य मुंबई व महाराष्ट्र राज्य उप प्रादेशिक परिवहन विभागातंर्गत 115 सेवा मोडतात त्यापैकी 82 सेवा ऑनलाईन झालेल्य असून या सेवा नागरिकांना शासनाच parivahan.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत यामध्ये नागरिकांना वाहनाचे व अनुज्ञाप्ती लाईसन विषयी घरबसल्या संगणकाव्दारे,मोबाईलव्दारे करता येऊ शकते.तसेच transport. maharashtra.gov.in या संकेत स्थळावर शासनाच्या नवीन जुन्या योजना वाहन धारकांसाठी मार्गदर्शक सुचना,नागरिकांसाठी सनद,शासनामार्फत पुरविण्यात येणारे अनुदान,करांबाबत सूचना,रस्ता सुरक्षाबाबत माहिती,महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातंर्गत येणारी कार्यालये त्यांचे संपर्क क्रमांक ही माहिती उपलब्ध असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक कार्यालयाचे उप प्रादेशिक परिहवन अधिकारी जयंत चव्हाण यांनी केले आहे.
नागरिकांनी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा काही अडचणी असल्यस शासनाच्या टोलर्फी क्रमांक 18001208040 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच mh23@mahatranscom.in या ईमेलवर अर्ज करावेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड यांच्यामार्फत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सकाळी 11.00 ते 2.00 या वेळेत उपलब्ध कार्यालयीन अभिलेखाचे अवलोक करता येईल. लागरिकांनी संकेत स्थळाचा वापर करुन या सुविधांचा लाभ घ्यावा.
Like this:
Like Loading...
Related