बीड जिल्ह्यात आज 32 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 2844 तर देशात 18870 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 29 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2262 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 32 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2230 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 8 बीड 11 गेवराई 2 केज 2 3 पाटोदा 5, शिरूर 2 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात २ हजार ८४४ नव्या रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत नगण्य वाढ झाली असली, तरी करोना बाधित मृतांच्या सख्येत वाढ झाल्याने स्थिती चिंताजनक आहे. तर परवाच्या तुलनेत काल बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून परवाच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटल्याने राज्याला हा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात राज्यात २ हजार ८४४ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या २ हजार ४३२ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ०२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात झालेल्या ६० रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ६५ हजार २७७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के इतके झाले आहे.राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार ७९४ इतकी आहे.
देशात 18 हजार 870 नव्या रुग्णांची नोंद
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे.
आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची रुग्णसंख्या 20 हजारांच्या आत आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात 18 हजार 870 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 378 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात 28 हजार 178 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्या आधी सोमवारी देशात 18 हजार 795 रुग्णांची भर पडली होती तर 179 जणांचा मृत्यू झाला होता.
देशातील सध्याची कोरोना स्थिती :
कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 37 लाख 16 हजार 451
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 29 लाख 86 हजार 180
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : दोन लाख 82 हजार 520
एकूण मृत्यू : चार लाख 47 हजार 751
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)