बीड जिल्ह्यात आज 41 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 2432 तर देशात 26041 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 28 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2358 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 41 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2317 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 3 बीड 3 धारूर 2 गेवराई 5 केज 3 माजलगाव 3 परळी 3 पाटोदा 11, शिरूर 4 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात २ हजार ४३२ नव्या रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत देखील घट झाली असून करोना बाधित मृतांच्या सख्येत देखील घट पाहायला मिळाली आहे. तसेच शिवाय कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटल्याने राज्यातील करोना संसर्गाची आजची स्थिती कालच्या तुलनेत अधिक दिलासादायक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ४३२ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार २०६ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण २ हजार ८९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार २९२ इतकी होती. तर, आज ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ३६ इतकी होती. (maharashtra registered 2432 new cases in a day with 2895 patients recovered and 32 deaths today)
आज राज्यात झालेल्या ३२ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ६२ हजार २४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के इतके झाले आहे.
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३७ हजार ०३६ इतकी आहे
देशात काल दिवसभरात 26 हजार 41 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी, अद्याप धोका टळलेला नाही. देशात काल दिवसभरात कोरोनाच्या 26 हजार 41 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
तसेच, 276 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 29 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा सध्या तीन कोटी 29 लाख 31 हजार 972 वर पोहोचला आहे. अशातच सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 99 हजार 620 वर पोहोचली आहे. देशातील एकूण आकडेवारीनुसार, आतापर्यंत तीन कोटी 36 लाख 78 हजार 786 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 47 हजार 194 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)