बीडमाजलगाव

माजलगाव धरण भरले:विसर्ग वाढण्याची शक्यता;नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे माजलगाव धरणात पाण्याची आवक वाढलेली असल्यामुळे, प्रकल्पातून सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आलेला आहे.

सद्यस्थितीत दु. ३:०० वा. सांडव्यातुन ६२,५१७ क्यूसेक विसर्ग सिंदफना नदीपात्रात सुरु आहे. तथापि, पाउस व त्यामुळे धरणात होणारी पाण्याची आवक, यानुसार विसर्गामध्ये वाढ करण्यात येवू शकते.

_सध्या माजलगाव धरण व पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने, ‘धरणात येणारे सर्व पाणी सिंदफना नदीपात्रात सोडावे लागणार असल्यामुळे सिंदफना व गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे, अशी विनंती प्रधासनाच्या वतीने करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *