बीड

बीड जिल्ह्यात आज 28 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3276 तर देशात 29616 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 26 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1971 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 28 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1943 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 6 बीड 7 गेवराई 1 धारूर 1 केज 4 माजलगाव 2 परळी 1 वडवणी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात दिवसभरात ३ हजार २७६ नवीन रुग्णांची भर

मुंबई: राज्यात करोना संसर्गाचा ग्राफ खाली येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आता ३ हजारांपर्यंत खाली आहे. त्याचवेळी मृत्यूचे प्रमाणही कमी होत असून करोना रिकव्हरी रेट सध्या ९७.२४ टक्के इतका आहे.
गेल्या २४ तासांतील आकडेवारी आरोग्य विभागाने प्रसिद्धीस दिली असून राज्यात काल आणखी ५८ करोना बाधित रुग्ण दगावले आहेत तर दिवसभरात ३ हजार २७६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्याचवेळी ३ हजार ७२३ रुग्ण करोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले आहेत.

करोनाची आजची स्थिती

  • राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
  • आज राज्यात ३ हजार २७६ नवीन रुग्णांचे निदान.
  • दिवसभरात ३ हजार ७२३ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६०,७३५ रुग्ण करोनामुक्त.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९७.२४ % एवढे.

देशात एका दिवसात 29,616 नवीन प्रकरणे वाढली

देशातील कोरोनाची परिस्थिती
एकूण सक्रिय प्रकरणे 3,01,442
24 तासात 70.86 लाख लसीकरण
एकूण लसीकरण 85.38 कोटी
शनिवारी सकाळी 08:00 पर्यंत कोरोनाची स्थिती
नवीन प्रकरणे 29,616
एकूण प्रकरणे 3,36,24,419
सक्रिय प्रकरणे 3,01,442
मृत्यू (24 तासांत) 290
एकूण मृत्यू 4,46,658
रिकव्हरी रेट 97.78 टक्के
मृत्यू दर 1.33 टक्के

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *