बीड

बीड जिल्ह्यात आज 42 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3131 तर देशात 26964 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 22 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2142 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 42 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2100 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 9 बीड 11 धारूर 1 गेवराई 2 केज 3 माजलगाव 4 पाटोदा 6 शिरूर 1 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात 3,131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात आज 3,131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 021 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 44 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे.

राज्यात आज 70 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 10, 875 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 40 हजार 712 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशामध्ये काल 26,964 कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत चढ-उतार अद्याप कायम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये काल दिवसभरात 26,964 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 383 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तर देशात काल दिवसभरात 34,167 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मंगळवारी केरळमध्ये 15,768 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही एक लाख 61 हजार 195 एवढी आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *