बीड

बीड जिल्ह्यात आज 41 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 2583 तर देशात 26115 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 21 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2273 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 41 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2232 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 3 बीड 9 गेवराई 5 केज 14 पाटोदा 4 शिरूर 1 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार सुरुच आहे. काल राज्यामध्ये 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर 3836 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 40 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.18 टक्के आहे. राज्यात सध्या 41672 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

काल (सोमवारी) राज्यात 2583 नवीन रुग्णांचे निदान झाले तर राज्यात काल 28 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 % एवढा आहे.

देशात गेल्या 24 तासांत 26,115 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

India Coronavirus Updates : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पाच दिवसांनी 30 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

आज आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 26,115 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 252 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच 34,469 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 35 लाख 4 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 45 हजार 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 27 लाख 49 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 9 हजार 575 रुग्ण अद्याप कोरोनावर उपचार घेत आहेत.

देशातील सध्याची कोरोना स्थिती :

कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 35 लाख 4 हजार 534
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 27 लाख 49 हजार 574
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 18 हजार 181
एकूण मृत्यू : चार लाख 45 हजार 385
देशातील एकूण लसीकरण : 81 कोटी 85 लाख 13 हजार डोस

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *