बीड जिल्ह्यात आज 39 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3586 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1928 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 39 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1889 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 12 बीड 9, केज 2 पाटोदा 9 शिरूर 1 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात ३ हजार ५८६ नव्या रुग्णांचे निदान
शुक्रवारी दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे.राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,काल दिवसभरात राज्यात ३ हजार ५८६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या ३ हजार ५९५ इतकी होती. तर काल दिवसभरात एकूण ४ हजार ४१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार २४० इतकी होती. तर, आज ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४५ इतकी होती.
राज्यात झालेल्या ६७ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख २० हजार ३१० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के इतके झाले आहे.
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४८ हजार ४५१ इतकी आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)