बीड जिल्ह्यात आज 44 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3595 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज 44 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3595 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3119 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 44 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3075 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 6 बीड 17, धारूर 1 गेवराई 1 केज 7 माजलगाव 1परळी 1 पाटोदा 5 शिरूर 1 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात ३,५९५ नवीन रुग्णांचं निदान
मुंबई : करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या बाधित रुग्णांची संख्या ४ हजारांहून कमी आढळत असल्याचं चित्र आहे.काल राज्यात ३,५९५ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे.
राज्यात ३,२४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,२०,३१० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०६ टक्के एवढं झालं आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात आज ४५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
करोनाची तिसरी लाट; पुढील तीन महिने महत्त्वाचे
नवी दिल्लीः करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत पुढील तीन महिने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महत्त्वाचे ठरू शकतात. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) आणि लसीकरणााबबत नेमलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी याबाबत इशारा दिला आहे. राज्यांनी यासाठी पूर्णपणे तयार राहावं, असं पॉल म्हणाले. तसंच आगामी दोन महिन्यांत सणासुदीच्या काळात करोनासंबंधी मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन पॉल यांनी नागरिकांना केलं आहे.
करोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान येऊ शकते, असं सर्व अंदाजांमध्ये वर्तवण्यात आलं आहे. देशात करोनाचा संसर्ग आटोक्यात आहे आणि केरळमधील स्थितीही सुधारत आहे. पण तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता आपल्या तयारीत कुठलीही कमतरता ठेवू नये, असं पॉल म्हणाले.
करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता राज्य सरकारांपासून ते नगरपालिकांनी रुग्णालयांमध्ये पुरेशा बेडची व्यवस्था आणि इतर तयारी पूर्ण करावी, असं पॉल यांनी म्हटलं आहे. तयारीत उणीवा राहिल्यास करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील स्थिती गंभीर झाली होती. अशा स्थितीपासून वाचण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारण्या करता केंद्राने २३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे. स्वतः पंतप्रधान मोदींनी काही दिवासांपूर्वी या पॅकेजच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)