बीड

बीड जिल्ह्यात आज 70 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3075 तर देशात 33376 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 12 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2350 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 70 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2280 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 9 बीड 21, धारूर 1 गेवराई 2 केज 17 माजलगाव 3 पाटोदा 5, शिरूर 3 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात 53 रुग्ण कोरोनामुक्त :उपचार घेत आहेत 517 रुग्ण

बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात होऊ लागला असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील चांगली आहे काल दिवसभरात 53 रुग्णांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली असून सध्या बीड जिल्ह्यात 517 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 1894 पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली असून त्यापैकी 98 हजार 648 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, याचबरोबर आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात 2729 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्ह दर 2.3 % टक्के असून डेथ रेट 2.67% टक्के इतका आहे बीड जिल्ह्यात 96.81 टक्के रिकव्हरी रेट असून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय-निमशासकीय अशा 85 कोविड सेंटर मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे 3403 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे सध्या 2878 बेड रिक्त आहेत

राज्यात ३ हजार ०७५ नव्या रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात शुक्रवारच्या तुलनेत काल करोना (coronavirus) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसत आहे. या बरोबरच झालेल्या मृत्यूंच्या संख्येत कालच्या तुलनेत घट झाली आहे. तर, कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याने राज्याला काल दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभरात राज्यात ३ हजार ०५६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार १५४ इतकी होती. तर काल दिवसभरात एकूण ३ हजार ०५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही संख्या ४ हजार ५२४ इतकी होती. तर, आज ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. ही संख्या ४४ इतकी होती. (maharashtra registered 3075 new cases in a day with 3056 patients recovered and 35 deaths today)
राज्यात झालेल्या ३५ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ०२ हजार ८१६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ७९६ इतकी आहे

देशात ३३ हजार ३७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – देशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत आहे. दरम्यान समोर येणारी दैंनदिन आकडेवारी तर असेच संकेत देत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाबाधितांच्या आणि मृतांच्या संख्येतही गेल्या काही दिवसांपासून चढउतार दिसून येत आहे.

काल दिवसभरात देशात ३३ हजार ३७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या तीन लाख ९१ हजार ५१६ झाली आहे. तर काल दिवसभरात ३२ हजार १९८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन कोटी २३ लाख ७४ हजार ४९७ वर पोहोचली आहे.

देशातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गेल्या ७८ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक दर सातत्याने तीन टक्क्यांच्या खालीच आहे. तर देशात काल दिवसभरात ३०८ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या आता चार लाख ४२ हजार ३१७ वर पोहोचली आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *