बीड जिल्ह्यात आज 55 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4154 तर देशात 34973 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 11 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2368 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 55 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2313 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 19 बीड 4, धारूर 4 गेवराई 2 केज 9 माजलगाव 3 पाटोदा 3, शिरूर 1 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात रुग्णसंख्या लाखाच्यावर:उपचार घेत आहेत 519 रुग्ण
बीड जिल्ह्यात कोणाचा प्रादुर्भाव व सुरु लागला असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील चांगली आहे काल दिवसभरात 65 रुग्णांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली असून सध्या बीड जिल्ह्यात 519 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 1839 पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली असून त्यापैकी 98 हजार 593 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, याचबरोबर आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात 2727 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्ह दर 2.9% टक्के असून डेथ रेट 2.67% टक्के इतका आहे बीड जिल्ह्यात 96.81 टक्के रिकव्हरी रेट असून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय-निमशासकीय अशा 85 कोविड सेंटर मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे 3403 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे सध्या 2878 बेड रिक्त आहेत
राज्यात 4,154 नवीन रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यात आज 4,154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
तर 4 हजार 524 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 91 हजार 179 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे.
राज्यात आज 44 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 812 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 213 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 57,02,628 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,91,179 (11.65 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,96,579 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,952 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशात ३४ हजार ९७३ नव्या करोना रुग्णांची नोंद
देशात गेल्या २४ तासांमध्ये ३४ हजार ९७३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात ३७ हजार ६८१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब अशी की, शुक्रवारच्या (९ सप्टेंबर) तुलनेत नव्या करोना रुग्णसंख्येत ७.७ टक्क्यांनी घट झाली आहे.
गेल्या २४ तासांत देशात करोनामुळे २६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही अधिकृत आकडेवारी जारी केली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, देशात सद्यस्थितीत एकूण ३ लाख ९० हजार ६४६ ऍक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. तर देशातील आतापर्यंतची एकूण करोना रुग्णसंख्या ही ३ कोटी ३१ लाख ७४ हजार ९५४ वर पोहोचली आहे. त्याचसोबत, करोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा ३ कोटी २३ लाख ४२ हजार २९९ इतका आहे. तर, देशात करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ४२ हजार ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सद्यस्थितीत करोनाचा रिकव्हरी रेट ९७.४९ टक्के इतका आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)