बीड जिल्ह्यात आज 79 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4219 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 10 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2765 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 79 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2686 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 8आष्टी 33 बीड 18, धारूर 1केज 5 पाटोदा 3, शिरूर 1 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत
बीड जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण संख्या झाली कमी
बीड जिल्ह्यात कोणाचा प्रादुर्भाव व सुरु लागला असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील चांगली आहे काल दिवसभरात 65 रुग्णांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली असून सध्या बीड जिल्ह्यात 603 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 1760 पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली असून त्यापैकी 98 हजार 431 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, याचबरोबर आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात 2726 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 2.1% टक्के असून डेथ रेट 2.67% टक्के इतका आहे बीड जिल्ह्यात 96.5 टक्के रिकव्हरी रेट असून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय-निमशासकीय अशा 85 कोविड सेंटर मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे 3403 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे सध्या 2862 बेड रिक्त आहेत
राज्यात ४ हजार २१९ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिसत असले तरी कमी झालेली रुग्णसंख्या किंचित का होईना, पण काही दिवसांपासून सतत वाढताना दिसत आहे. आज गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाही दैनंदिन रुग्णसंख्या वाढली असून खाली घसरलेली एकूण सक्रिय रुग्णसंख्या देखील ५० हजारांवर गेली आहे. हे पाहता आजची स्थिती तुलनेने चिंताजनक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ४ हजार २१९ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार १७४ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण २ हजार ५३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार १५५ इतकी होती. तर, आज ५५ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ६५ इतकी होती.
आज राज्यात झालेल्या ५५ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ९५ हजार २३६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके झाले आहे.आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार २२९ इतकी आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)