सार्वजनिक गणेशोत्सव साठी बीड पोलिसांची नियमावली
आगामी सार्वजनिक गणेशोत्सव 2021 हा कोरोना(कोव्हिड-19)विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असल्याने बीड पोलीसांकडून नागरीकांना आवाहन करण्यात येते की,कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून या वर्षीचा गणेशोत्सव अत्यंत
साध्या पध्दतीने साजरा करावा. त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी स्थानिक प्रशासनाची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
- शासन आदेशाप्रमाणे गणेश मुर्तीचे मुख दर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येवून दर्शन घेण्यास
प्रतिबंध करण्यात आला असून दर्शन केवळ ऑनलाईन माध्यमाद्वारे उपलब्ध करून देण्यात
यावे. - मा.न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश व स्थानिक प्रशासनाचे मंडपबाबत धोरण याचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत.
- घरगुती व सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. व श्री गणेशाची मुर्ती ही सार्वजनिक मंडळासाठी 04 फुट व घरगुती श्रीगणेश मुर्ती ही 02 फुट मर्यादितेत असावी.
- कोव्हिड संसर्गाच्या परिस्थिती मध्ये शक्यतो पारंपारिक गणेश मुर्ती ऐवजी घरातील
धातू/संगमरवर आदि.मुर्तीचे पुजन करावे. - मुर्ती शाडूची/पर्यावरण पुरक असावी,असल्यास त्या मुर्तीचे विर्सजन घरच्या घरी करावेत.
- श्री गणेश मंडळाच्या मंडप व डेकोरेशन चा सार्वजनिक वाहतुकीस व पादचारी याना अडथळा होणार नाही याची गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी.तसेच मंडळाचे संरक्षण / सुरक्षा देखरेख यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मंडळाची राहील.
- श्री.गणेश भक्तांनी/ मंडळांनी पर्यावरण प्रदूषण (ध्वनी,हवा,पाणी) याबाबतच्या नियमांचे व तरतुदीचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.असे बीड जिल्हा पोलिसांच्या वतीने कळवण्यात आले आहे