बीड

बीड जिल्ह्यात आज 57 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4174 तर देशात 43263 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज 57 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4174 तर देशात 43263 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 9 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2751 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 57 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2694 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात आष्टी 23 बीड 11, गेवराई 2,केज 8 पाटोदा 6 शिरूर 1 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात 4174 तर देशात 43263 कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 43,263 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 338 जणांचा मृत्यु झाला आहे.

त्याचबरोबर काल दिवसभरात 40,567 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील दररोजच्या कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या ही केरळमधून समोर येत आहे. एकट्या केरळमध्ये बुधवारी 30,196 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 181 जणांचा मृत्यू झाला. केरळ मधील कोरोनाबाधितांची ही संख्या देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्क्यांहून अधिक आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 4,174 नवीन कोरोनाबाधितांची रुग्णांची नोंद झाली आहे. तर 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात बुधवारी 4 हजार 155 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 8 हजार 491 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97. 09 टक्के आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *