बीड

बीड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 6 जणांचा मृत्यू:29 पशुधन दगावले तर 20 घरांची पडझड

बीड- बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे जवळपास पूर्णच पिकांची वाताहात लागली आहे त्याच बरोबर या नैसर्गिक आपत्तीत 6 जण दगावले असून 29 पशुधनाची हानी झाली आहे तर 20 ठिकाणी घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे

बीड जिल्ह्यात दिनांक 4 सप्टेंबर पासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीमुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णच उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,तर जिल्ह्यातील मोठ्या धरणाच्या पाण्याची पातळी देखील वाढली असून नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या चार दिवसाच्या काळात वडवणी तालुक्यात बंधाऱ्यात वाहून जाऊन 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर अंगावर भिंत पडून बीडमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे तसेच गेवराई तालुक्यात अंगावर भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे

त्याच बरोबर कपिलधार येथे वाहत्या पाण्यात एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाले आहे या बरोबरच पशुधनाची हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे केज तालुक्यात पुराच्या पाण्यात तीन बैल वाहून गेले असून धारूर मध्ये एक आष्टी मध्ये सहा शेळ्या दोन बैल दोन वासरू एक म्हैस पुरात वाहून गेल्याची माहिती असून पाटोदा तालुक्यात एक वगार वाहून गेले आहे ,गेवराई तालुक्यात पुराच्या पाण्यात एक गाय तीन बैल वाहून गेले असून जवळपास 1200 कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत तर शिरूर कासार तालुक्‍यात एक शेळी आणि 50 कोंबड्या वाहून गेल्या असून बीड तालुक्यात पाच शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे

याचबरोबर अतिवृष्टीमुळे बीड आणि शिरूर कासार तालुक्‍यात 20 ठिकाणी घरांची पडझड झाली असून पावसामुळे झालेल्या अतिवृष्टी भागात सर्व तहसीलदार यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून ही माहिती प्राथमिक स्वरूपात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे, जिवित आणि वित्तहानी बरोबरच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान ते येत्या एक-दोन दिवसातच स्पष्ट होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *