बीड जिल्ह्यात आज 41 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 3898 तर देशात 31222 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 8 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2589 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 41 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2548 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 18 धारूर 2 गेवराई 1,केज 6 माजलगाव 2 परळी 1 पाटोदा 2 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात आज ३ हजार ८९८ नव्या रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात आज करोना (coronavirus) बाधितांची दैनंदिन रुग्णसंख्या मात्र किंचित वाढली असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील मोठी घट झाली आहे. या बरोबरच काल झालेल्या मृत्यूंच्या संख्येत कालच्या तुलनेत वाढ झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी वाढली असल्याने आजची स्थिती तुलनेने चिंताजनक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,काल दिवसभरात राज्यात ३ हजार ८९८ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या ३ हजार ६२६ इतकी होती. तर काल दिवसभरात एकूण ३ हजार ५८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५ हजार ९८८ इतकी होती. तर, काल ८६ रुग्णांचा मृत्यू झाला. परवा ही संख्या ३७ इतकी होती.
काल राज्यात झालेल्या ८६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ०४ हजार ३३६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ९२६ वर आली आहे.
देशात गेल्या 24 तासांत 31 हजार 222 नव्या रुग्णांची नोंद
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा धोका अद्याप टळलेला नाही. अद्यापही दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 31 हजार 222 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलेली आहे.
आरोग्यमंत्रालयाच्या वतीनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 42 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढून तीन कोटी 22 लाख 24 हजार 937 वर पोहोचली आहे. तर सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 92 हजार 864 एवढी आहे.
आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 30 लाख 58 हजार 843 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ज्यापैकी आतापर्यंत 4 लाख 41 हजार 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)