बीड

बीड जिल्ह्यात आज 45 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4057 तर देशात 42766 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 6 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2654 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 45 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2609 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 6 आष्टी 16 बीड 10 गेवराई 4 केज 4,परळी 1 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ४,०५७ नवे रुग्ण आढळले

मुंबई: राज्यात शनिवारच्या तुलनेत रविवारी करोना (Coronavirus) बाधितांची दैनंदिन रुग्णसंख्या मात्र किंचित घटली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची (covid Active Patients) संख्या देखील थोडी घटली आहे. या बरोबरच काल झालेल्या मृत्यूंच्या संख्येत कालच्या किंचित वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी एकूण स्थिती पाहता राज्यात करोनावर नियंत्रण असल्याचे स्पष्ट होत असल्याने राज्याला आज दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिवसभरात राज्यात ४ हजार ०५७ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. परवा ही संख्या ४ हजार १३० इतकी होती. तर दिवसभरात एकूण ५ हजार ९१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही संख्या २ हजार ५०६ इतकी होती. तर, आज ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. परवा ही संख्या ६४ इतकी होती. (maharashtra registered 4057 new cases in a day with 5916 patients recovered and 67 deaths today)
राज्यात झालेल्या ६७ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ९४ हजार ७६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ०९५ वर आली आहे.

चिंता वाढली! देशात पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढत

नवी दिल्लीः देशात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने ( coronavirus india ) वाढत आहे. काल सलग ५ व्या दिवशी करोनाचे ४० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले. देशात गेल्या २४ तासांत ४२, ७६६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ३०९ नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यादरम्यान, ३८, ०९६ जणांनाच करोनाने मृत्यू झाला आहे. देशात सध्या करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही पुन्हा ४ लाखांवर म्हणजे ४, १०,०८४ इतकी झाली आहे. तर करोनातून बरे होण्याचा दर हा ९७.४२ टक्के इतका आहे.
सलग ५ व्या दिवशी देशात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. रोज ४० हजारांवर नवीन रुग्णांची नोंद होत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३०९ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात करोनाने ४,४०,५३३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये गेल्या २४ तासांत २९, ६८२ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *