बीड जिल्ह्यात आजही 67 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4130 तर देशात 42618 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 5 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2959 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 67 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2892 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 20 बीड 18 धारूर 3 गेवराई 3 केज 13 माजलगाव 1 पाटोदा 1, शिरूर 1 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 4,130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यात काल 4,130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 506 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 88 हजार 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 0२ टक्के आहे.
राज्यात 64 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 52 हजार 025 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशात 24 तासात कोरोनाच्या 42618 नवीन रुग्णांची भर
गेल्या काही दिवसापासून देशात पुन्हा एकदा कोरोना च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनाच्या 42 हजार 618 नवीन रुग्णांची भर पडली असून 330 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 36 हजार 385 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधी शुक्रवारी 45,352 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 366 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
केरळमध्ये कोरोना ची सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत असून काल एकाच दिवसात त्या ठिकाणी 29 हजार 322 रुग्णांची भर पडली आहे तर 131 जणांचा मृत्यू झाला.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)