आजपासून मराठवाड्यात मुसळधारांची शक्यता:यलो अलर्ट
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पहायला मिळाला. तर राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणारा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मुसळधारांची शक्यता आहे.
पुणे, नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यासह पश्चिम-मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी आणि विदर्भातही काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागांत काही ठिकाणी आजपासून 8 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता देण्यात आली आहे. रायगड आणि पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी 7 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशाराही आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढचे चार दिवस राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून वापसीचे संकेत मानले जात आहेत. राज्या आजपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.