बीड

बीड जिल्ह्यात आज फक्त 67 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4360 तर देशात 45352 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 4 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3388 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 67 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3321 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 27 बीड 14 धारूर 4 केज 4 माजलगाव 2 पाटोदा 5, शिरूर 1 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ४ हजार ३६० नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोना बाधितांच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली झाल्याने एकीकडे चिंताजनक स्थिती आहे. मात्र असे असले तरी करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी घट झाल्याने राज्याला दिलासाही मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ४ हजार ३१३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार ३४२ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ४ हजार ३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ७५५ इतकी होती. तर, आज ९२ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ५५ इतकी होती.

देशात गुरुवारी (२ सप्टेंबर २०२१) ४५ हजार ३५२ करोनाबाधित रुग्ण

नवी दिल्ली : भारताला करोना संक्रमणाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोक्या दरम्यान भारतातल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा एकदा जवळपास चार लाखांवर पोहचलीय.
आज (शुक्रवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी (२ सप्टेंबर २०२१) ४५ हजार ३५२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत तब्बल ३६६ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय.
याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी २९ लाख ०३ हजार २८९ वर पोहचलीय. तर देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ३९ हजार ८९५ वर पोहचलीय.
देशात सध्या ३ लाख ९९ हजार ७७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी ३४ हजार ७९१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी २० लाख ६३ हजार ६१६ वर पोहचलीय.

एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : ३ कोटी २९ लाख ०३ हजार २८९
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : ३ कोटी २० लाख ६३ हजार ६१६
उपचार सुरू : ३ लाख ९९ हजार ७७८
एकूण मृत्यू : ४ लाख ३९ हजार ८९५
करोना लसीचे डोस दिले गेले : ६७ कोटी ०९ लाख ५९ हजार ९६८
देशातील सक्रीय रुग्णांचा दर एकूण रुग्णांच्या १.२२ टक्के आहे. दैनिक पॉझिटिव्हिटी रेट २.७२ टक्क्यांवर आहे तर देशाचा रिकव्हरी रेट ९७.४५ टक्के आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *