बीड

बीड जिल्ह्यात आज फक्त 57 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4342 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 3 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2873 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 57 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2816 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 25 बीड 5 धारूर 4 गेवराई 2 केज 3 माजलगाव 3 परळी 2 पाटोदा 5, वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ४ हजार ३४२ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात आज करोना (Coronavirus) बाधितांच्या मृत्यूंच्या संख्येत मोठी घट झाली असून तर दैनंदिन रुग्णसंख्याही किंचित घटलीआहे, एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी घटल्याने राज्याला काल दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,काल दिवसभरात राज्यात ४ हजार ३४२ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार ४५६ इतकी होती. तर काल बुधवारी दिवसभरात एकूण ४ हजार ७५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ४३० इतकी होती. तर,दिवसभरात ५५ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या १८३ इतकी होती. (maharashtra registered 4342 new cases in a day with 4755 patients recovered and 55 deaths today)
काल राज्यात झालेल्या ५५ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ८१ हजार ९८५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ६०७ वर आली आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *