बीड जिल्ह्यात आज 105 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4355 तर देशात 46164 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 26 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4564 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 105 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4459 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 7 आष्टी 38 बीड 25 धारूर 4 गेवराई 2 केज 9 परळी 3 पाटोदा 5 शिरूर 1,वडवणी 11 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात गेल्या २४ तासात 4,355 नवीन कोरोनाबाधित
मुंबई – राज्यात गेल्या २४ तासात 4,355 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 43 हजार 034 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के आहे. राज्यात गेल्या २४ तासात 119 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासातएकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 49 हजार 752 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
भारतात गेल्या 24 तासात 46, 164 नवीन कोरोना रुग्ण
नवी दिल्ली, २६ ऑगस्ट | भारतात गेल्या 24 तासात 46, 164 नवीन कोरोना रुग्ण आढळले. 34,159 रुग्ण बरे झाले. 607 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे भारतातील एकूण रुग्णसंख्या 3,25,58,530 इतकी झाली आहे.
आतापर्यंत एकूण 3,17,88,440 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 3,33,725 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 436365 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण 60,38,46,475 (80,40,407) जणांचे भारतात लसीकरण झाले आहे.
देशातील रिकव्हरी रेट ९७.६३ टक्क्यांवर आहे. विकली पॉझिटीव्हीटी रेट २.२ टक्क्यांवर असून डेली पॉझिटीव्हीटी रेट २.९८ टक्क्यांवर आहे. हा रेट गेल्या ३१ दिवसांपासून तीन टक्क्यापेक्षा खाली आहे. एकट्या केरळ राज्यात गेल्या २४ तासांत ३१ हजार ४४५ रुग्ण आढळले असून २१५ जणांचा मृत्यू झाला आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)