जिल्ह्यातील 11 तालुक्यात होणार ई-पिक पाहणी:शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा
बीड, दि.25 (जि.मा.का.):- बीड जिल्हयातील सर्व 11 तालुक्यांत ई-पिक पाहणी प्रकल्प राबविण्यास शासनाने यापुर्वीच मान्यता दिली आहे. मोबाईल ॲपवर ई-पिक पाहणी ॲप उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे, त्यामध्ये बीड जिल्हयाचा समावेश कलेला आहे.
आपण त्वरीत प्लेस्टोअर वर जावून आपल्या मोबाईल मध्ये नविन ई-पिक पाहणी ॲप डाऊनलोड करावे व पुर्वीचे जुने ॲप डिलिट करावे.आपणास ई-पिक पाहणीचे तलाठी व कृषी सहाय्यक यांचेमार्फत गाववार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्यामध्ये आपला सहभाग मोलाचा आहे.
गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल, धान्य दुकानदार, तंटामुक्ती अध्यक्ष, बचत गट प्रतिनिधी, अध्यक्ष, सहकारी सचिव, शेतकरी उत्पादक संघ अध्यक्ष, माविम संयोगिणी, पाणी फाउंडेशन गट, पोकरा प्रतिनिधी, ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक सहाय्यक, बॅक प्रतिनिधी, शाळा व कॉलेज विदयार्थी, प्रगतीशिल शेतकरी, डॉक्टर्स, सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, मिडीया प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र इ. प्रशिक्षणात सहभागी व्हावे. ई-पिक पाहणी सर्वानी व्हॉटसअप असल्यास ग्रुपच्या माध्यमातून ई-पिक पाहणी ॲपच्या संबंधी माहिती घ्यावी.
यापुढे ई-पिक पाहणी काम शेतकऱ्यांना स्वत:च ई-पिक पाहणी ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना तलाठयांना शोधण्याची गरज भासणार नाही.
ई-पिक पाहणी सोबतच ईतरही विविध नोंदी शेतकऱ्यांना करता येणार असल्यामुळे पिक विमा, पिक कर्ज, शासकीय मदत ई. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. आपले संबंधित तालुका वाईज हेल्पडेस्कच्या माध्यमातून सकाळी 08.00 ते सायं. 06.00 वाजेपर्यत ई-पिक पाहणी संबंधित शंका व अडचणी असल्यास खालील क्रमांकावर विचारुन त्यांचे आपणास निरसन करता येणार आहे.
बीड-8805247773
पाटोदा-9834703973
धारुर-9890456062
आष्टी-9834703973
वडवणी-9890456062
परळी वै-9623004589
माजलगाव-9890456062
अंबाजोगाई-9096591991
शिरुर कासार-9763498955
केज-9096591991
गेवराई-9763498955
राज्यस्तरीय हेल्प डेस्क क्र. :- 02025712712
उपरोक्त ई-पिक पाहणी उपक्रमामध्ये समाजाच्या विविध घटकांनी भाग घ्यावा. व्हॉटस ॲप ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी ई-पिक पाहणी कामी योगदान दयावे, असे अवाहन करण्यात येत आहे.