बीड जिल्ह्यात लाखाच्या जवळपास कोरोना मुक्त:1125 ऍक्टिव्ह रुग्ण
बीड-जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 485 इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाली होती त्यात 96666 जण कोरोनातून मुक्ती झाले,जिल्ह्यात आतापर्यंत 2694 लोकांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा डेथ रेट 2.68%आहे तर पॉझिटिव्ह रेट 11.35% इतका आहे रिकव्हरी रेट 96.19% इतका आहे,आज दि 23 रोजी 103 जणांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे,
बीड जिल्ह्यात जवळपास 5133 खाटांची व्यवस्था आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे,जिल्ह्यातील 98 ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था असून 4253 बेड सध्या शिल्लक आहेत,आज केवळ एकाचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे,आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती मध्ये दर दिवशी मृत्यूचा आकडा देने वगळण्यात आला आहे,