बीड

बीड जिल्ह्यात आज 115 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4365 तर देशात 36571 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 21 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4221 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 115 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4106 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 6 आष्टी 44 बीड 12 धारूर 17 गेवराई 5 केज 13 माजलगाव 3 परळी 1 पाटोदा 8 शिरूर 2 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ४ हजार ३६५ नवीन कोरोनाबाधित

मुंबई : आज दिवसभरात राज्यात ६ हजार ३८४ रूग्ण कोरोनातून बरे झाले, तर ४ हजार ३६५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, १०५ कोरोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,२१,३०५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.९७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६४,१५,९३५ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १३५६७२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

देशात ३६ हजार ५७१ रुग्णांची नोंद

देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ५७१ करोनाबाधित आढळले असून ५४० जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६३ हजार ६०५ वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५० दिवसांतील सर्वात कमी आहे. तर गेल्या २४ तासांत ३६ हजार ५५५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी १५ लाख ६१ हजार ६३५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.५४ टक्क्यांवर आहे.
देशात करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ५८९ रुग्ण दगावले आहेत. सध्या विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९३ टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या ५६ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्के असून हा दर गेल्या २५ दिवसांपासून सलग ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *