बीड जिल्ह्यात आज 93 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 5225 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 20 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5335 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 93 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5242 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 3 आष्टी 34 बीड 18 धारूर 5 गेवराई 5 केज 6 माजलगाव 2 पाटोदा 12 शिरूर 3 वडवणी 5 असे रुग्ण आढळून आले आहेत
दुसरी लाट नियंत्रणात:२४ तासांत राज्यात ५ हजार २२५ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला असला तरी दैनंदिन रुग्णसंख्या अजूनही पाच हजारांच्या वरच असल्याने करोनाचा धोका अजून टळलेला नाही. करोनाच्या तिसऱ्या लाटेचीही भीती कायम असून स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Update )
राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत अहवाल सादर करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे राज्याचा साप्ताहिक सरासरी करोना पॉझिटिव्हिटी रेट २.४४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यात करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही करोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. तर सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मात्र रुग्णवाढ कायम असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. यापार्श्वभूमीवर करोनाची आजची आकडेवारी हाती आली असून आजही पाच हजारांवर नवीन रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज करोनाने आणखी १५४ रुग्णांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५ हजार २२५ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ५ हजार ५५७ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत.
करोनाची कालची स्थिती
- राज्यात आज १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.११ % एवढा आहे.
- गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार २२५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५ हजार ५५७ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६२,१४,९२१ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.९३ % एवढे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)