बीड जिल्ह्यात आज 143 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 5132 तर देशात 36401 रुग्णांची नोंद
बीड जिल्ह्यात आज दि 19 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5852 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 143 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5709 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 7 आष्टी 66 बीड 12 धारूर 3 गेवराई 8 केज 8 माजलगाव 5 पाटोदा 20 शिरूर 2 वडवणी 12 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात 5132 नवीन कोरोना बाधीत
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 5132 नवीन प्रकरणे नोंदली गेली, त्यानंतर राज्यात संक्रमित लोकांची संख्या 64,06,345 वर गेली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
अधिकाऱ्याने सांगितले की, साथीच्या आजारामुळे राज्यात 158 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर राज्यातील मृतांची संख्या 1,35,413 झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी राज्यात नवीन प्रकरणे आणि मृत्यूंची संख्या वाढली आहे. मंगळवारी हा आकडा अनुक्रमे 4,408 आणि 116 होता.
अधिकारी म्हणाले की, आज राज्यात 8,196 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत, त्यानंतर राज्यात संसर्गमुक्त झालेल्या लोकांची संख्या 62,09,364 झाली आहे. ते म्हणाले की, सध्या राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 58,069 आहे. राज्यात संसर्गमुक्त दर 96.83 टक्के आहे तर मृत्यूदार 2.11 टक्के आहे.
देशात २४ तासांत ३६ हजार ४०१ नवीन करोनाबाधित
देशात गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासांत ३६ हजार ४०१ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, ५३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून ३९ हजार १५७ जणांनी करोनावर मात केली आहे.
देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २३ लाखांवर गेली असून त्यापैकी ३ कोटी १५ लाख २५ हजार ८० रुग्ण बरे झाले आहेत.
देशात सध्या ३ लाख ६४ हजार १२९ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या १४९ दिवसांतील सर्वात कमी आहे. तर, आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी केट ९७.५३ टक्के आहे. तर विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९५ टक्के असून गेल्या ५५ दिवसांपासून हा रेट ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्के असून तो गेल्या २४ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ५०.०३ कोटी करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)