बीड

बीड जिल्ह्यात आज 100 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4408 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 18 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5830 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 100 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5730 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 8 आष्टी 22 बीड 25 धारूर 7 गेवराई 5 केज 8 माजलगाव 4 पाटोदा 11 शिरूर 4 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत

२४ तासांत राज्यात ४ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत किंतिच वाढ झाली असून मृत्यूंच्या संख्याही १६ ने वाढली आहे. तसेच, बरे होणाऱ्या रुग्णाची संख्याही थोडीशी कमीच झाली आहे. असे असले तरी राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत मात्र घट झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काल दिवसभरात एकूण ११६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात ४ हजार ४०८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच एकूण ५ हजार ४२४ इतके रुग्ण बरे झाले आहेत. (maharashtra registered 4408 new cases in a day with 5424 patients recovered and 116 deaths today)
राज्यात झालेल्या ११६ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर मात्र २.११ टक्क्यांवरच आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ०१ हजार १६८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८७ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६१ हजार ३०६ वर आली आहे

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *