बीड

बीड जिल्ह्यात आज फक्त 92 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4797 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 16 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4831 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 92 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4739 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 38 बीड 11 धारूर 5 गेवराई 5 केज 8 माजलगाव 4 पाटोदा 13 शिरूर 4 वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत

२४ तासांत राज्यात ४ हजार ७९७ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात करोनाच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत मोठी घट झाली असून मृत्यूंच्या संख्याही किंचित घटली आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल दिवसभरात एकूण १३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात ४ हजार ७९७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच एकूण ३ हजार ७१० इतके रुग्ण बरे झाले आहेत. (maharashtra registered 4797 new cases in a day with 3710 patients recovered and 130 deaths today)
रविवारी राज्यात झालेल्या १३० रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर आता २.११ टक्क्यांवरच आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ८९ हजार ९३३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६४ हजार २१९ इतकी आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *