बीड

बीड जिल्ह्यात 119 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6388 तर देशात 40120 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 13 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 6602 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 119 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 6483 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 7 आष्टी 42 बीड 29 धारूर 8 गेवराई 3 केज 5 माजलगाव 4 पाटोदा 11 शिरूर 4 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ६ हजार ३८८ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई- करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कालच्या मृत्यूंची संख्या चिंतेत भर घालणारी आहे. दिवसभरात एकूण २०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या १६३ इतकी होती. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात ६ हजार ३८८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच एकूण ८ हजार ३९० इतके रुग्ण बरे झाले आहेत. (maharashtra registered 6388 new cases in a day with 8390 patients recovered and 208 deaths today)
काल राज्यात झालेल्या २०८ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून २.०१ टक्क्यांवरच स्थिरावलेला दर आता २.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ७५ हजार ०१० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६२ हजार ३५१ इतकी आहे.

देशात 40 हजार 120 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

India Coronavirus Updates : भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत आहे. देशात सध्या दररोज 40 हजारांच्या आसपास कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 40 हजार 120 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 585 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसाआधी 41 हजार 195 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच काल दिवसभरात देशात 42 हजार 295 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील कोरोनाची एकूण आकडेवारी

कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 21 लाख 17 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

यापैकी 4 लाख 30 हजार 254 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 13 लाख 2 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाबाधितांचा सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 85 हजार रुग्ण अजूनही कोरोनावर उपचार घेत आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

देशातील सध्याची कोरोनास्थिती

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 21 लाख 17 हजार 826
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 13 लाख 2 हजार 345
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 85 हजार 227
एकूण मृत्यू : चार लाख 30 हजार 254

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *