ऑनलाइन वृत्तसेवावृत्तसेवा

एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षा: १२ ते १६ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी

MHT-CET 2021 | शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT-CET 2021) या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षा 2021 साठी अर्ज नोंदणी करण्यास पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहे. राज्य शासनाने (State Government) वेगवेगळ्या विद्याशाखेच्या प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे.

याबाबत माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 प्रवेश घेणाऱ्यासाठी अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. https://mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष बाब म्हणून 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी संधी देण्यात आलीय. दरम्यान, याअगोदर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जामधील दुरूस्ती करण्यासाठी दिनांक 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधील संधी देण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी http://mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी माहिती मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली आहे.

असा करा अर्ज –

– MHT CET 2021 साठी अर्ज करण्यासाठी प्रथम mhtcet2021.mahacet.org. या वेबसाईटला भेट देणे.

– त्यासाठी MHT CET 2021 registration येथे क्लिक करणे आवश्यक.

– सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थित भरणे आणि सेव्ह वर क्लिक करणे.

– MHT CET 2021 application form भरण्यासाठी अ‌ॅप्लिकेशन क्रमांक आणि पासवर्ड टाकणे आवश्यक.

– त्यानंतर अर्जासाठीची फी ऑनलाईन पद्धतीने भरून सबमीट या बटणावर क्लिक करणे. त्यांनतर प्रिंट मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *