दिरंगाईचा फटका:बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची अखेर बदली:राधाविनोद शर्मा यांची नियुक्ती
बीड- हिंगोली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अरीबम राधाविनोद शर्मा हे बीडचे नवे जिल्हाधिकारी असतील.विद्यमान जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या बदलीचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर शासनाने शर्मा यांची नियुक्ती केली आहे .
बीडसह जिल्ह्यातील पंचायत समिती मध्ये झालेल्या घोटाळ्याची लक्षपूर्वक चौकशी आणि कारवाई मध्ये दिरंगाई केल्यामुळे औरंगाबाद हाय कोर्टाने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची तात्काळ बदली करून त्यांच्या जागी नवीन जिल्हाधिकारी नेमावा आणि आलेल्या नवीन जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी अहवाल न्यायालयात दाखल करावा असे आदेश दिले होते त्यानुसार राधाविनोद शर्मा हे बीडचे नवे जिल्हाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत आता या प्रकरणात काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
2007 साली कॉम्प्युटर सायन्स मध्ये बिर्ला इन्स्टिट्यूट रांची येथून पदवी घेतल्यानंतर राधाविनोद यांनी 2008 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली,मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आल्यावर त्यांनी 2010 पर्यंत खाजगी कंपनीत नोकरी केली .त्यानंतर 2012 साली मणिपूर राज्यातून ते 128 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले .
बीडचे विद्यमान जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यावर पंचायत समिती भ्रष्टाचार प्रकरणी दिरंगाई केल्याप्रकरणी न्यायालयाने ठपका ठेवत बदली करण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाने शर्मा यांची नियुक्ती केली आहे .