बीड

बीड जिल्ह्यात 109 पॉझिटिव्ह रुग्ण:बाधितांचे प्रमाण आज कमी,राज्यात 4505 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 11 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 6329 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 109 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 6220 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 27 बीड 17 धारूर 7 गेवराई 5 केज 8 माजलगाव 5 परळी 5 पाटोदा 24 शिरूर 2 वडवणी 8 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ५ हजार ६०९ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट हळहळू नियंत्रणात येत आहे. दैनंदिन रुग्णांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत ५ हजार ६०९ नवीन रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी ७ हजार ७२० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, आज करोनाने आणखी १३७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा आता १ लाख ३४ हजार २०१ इतका झाला आहे.

करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात होते. एकूण रुग्णसंख्या सात लाखांच्या घरात पोहचली होती. ही स्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ६६ हजारांपर्यंत खाली आली आहे.

राज्यातील करोनाची आजची स्थिती

  • राज्यात आज १३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.
  • आज राज्यात ५ हजार ६०९ नवीन रुग्णांचे निदान.
  • दिवसभरात ७ हजार ७२० रुग्ण बरे होऊन परतले घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५९,६७६ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८ % एवढे झाले.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९९,०५,०९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६३,४४२ (१२.७५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
  • राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ६६ हजार १२३ इतकी.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *