बीड

बीड जिल्ह्यात 150 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4505 रुग्णांची नोंद

बीड जिल्ह्यात आज दि 10 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4445 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 150 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4295 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 26 बीड 47 धारूर 6 गेवराई 8 केज 16 माजलगाव 7 परळी 1 पाटोदा 13 शिरूर 10 वडवणी 12 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ४ हजार ५०५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद 

दिवसभरात राज्यात 04 हजार 505 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 07 हजार 568 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 68 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५१,९५६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.७६ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६३,५७,८३३ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आजपर्यंत राज्यात १,३४,०६४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली.

तर सध्या राज्यातील मृत्यू दर २.१टक्के एवढा आहे. तसेच राज्यात रविवारपर्यंत ४ कोटी ६७ लाख ५८ हजार ९३१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ८ ऑगस्ट २०२१ रोजी ६७,४८२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *