बीड

कोरोनाचा चढउतार:बीड जिल्ह्यात 167 पॉझिटिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 9 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3648 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 167 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3481 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 5 आष्टी 39 बीड 55 धारूर 10 गेवराई 10 केज 13 माजलगाव 3 पाटोदा 15 शिरूर 16 वडवणी 1असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात ५ हजार ५०८ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: आज राज्यातील करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असून गेल्या २४ तासांत एकूण ५ हजार ५०८ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ४ हजार ८९५ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण १५१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या १५१ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही मृत्यूदर मात्र गेल्या काही दिवसांपासून २.०१ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ४४ हजार ३८८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७१ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७१ हजार ५१० इतकी आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *