आज पुन्हा दोनशे पार आकडा:बीड जिल्ह्यात 216 पॉझिटिव्ह रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 8 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5152 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 216 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4936 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 9 आष्टी 70 बीड 31 धारूर 3 गेवराई 18 केज 12 माजलगाव 31 परळी 3 पाटोदा 21 शिरूर 9 वडवणी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत
दिवसभरात ६ हजार ६१ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई: राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असताना संसर्गाचा विळखाही सैल होत चालला आहे. दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण खाली येत असून करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. नवीन बाधितांचा आकडाही नियंत्रणात असून राज्यासाठी हे चांगले संकेत मानले जात आहेत. दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यात आज फक्त दोन नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ( Coronavirus In Maharashtra Latest Update )
राज्यात गेल्या २४ तासांत १२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा आता १ लाख ३३ हजार ८४५ इतका झाला आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.१ टक्के इतका आहे. बाकी आकडेवारीवर नजर मारल्यास आज दिवसभरात ६ हजार ६१ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी त्यापेक्षा अधिक म्हणजेच ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यासोबतच राज्याचा रिकव्हरी रेट वाढून आता ९६.७२ टक्के इतका झाला आहे. करोनाचा ग्राफ खाली येत असताना अॅक्टिव्ह अर्थात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही घटत चालली आहे. आजच्या नोंदीनुसार सध्या ७१ हजार ५० रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत.
राज्यात अशी राहिली आजची स्थिती…
- राज्यात आज १२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- दिवसभरात ६ हजार ६१ नवीन रुग्णांचे निदान तर ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६१,३९,४९३ करोना बाधित रुग्णांनी केली करोनावर मात.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.७२ % एवढे झाले आहे.
देशात ३९ हजार ०७० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
गेल्या २४ तासांत देशभरात ४३ हजार ९१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत देशात एकूण ३९ हजार ०७० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (india reports 39 070 new corona cases and 491 deaths in last 24 hours)
तर, याच कालावधीत ४९१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ४ लाख २७ हजार ८६२ झाली आहे. तर, गेल्या २४ तासांत ४३ हजार ९१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.३९ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत एकूण ०३ कोटी १० लाख ९९ हजार ७७१ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ४ लाख ०६ हजार ८२२ इतकी आहे. गेल्या २४ तासांत ५५ लाख ९१ हजार ६५७ नागरिकांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण ५० कोटी ६८ लाख १० हजार ४९२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)