बीड

बीड जिल्ह्यात आज 124 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 4867 तर देशात 30549 बाधीत

बीड जिल्ह्यात आज दि 3 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3622 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 124 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3498 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 25 बीड 28 धारूर 4 गेवराई 20 केज 6 माजलगाव 4 पाटोदा 18 शिरूर 10 वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात दिवसभरात ४ हजार ८६९ नवीन करोनाबाधित

राज्यात आज दिवसभरात ४ हजार ८६९ नवीन करोनाबाधित आढळले तर, ८ हजार ४२९ रूग्ण करोनातून बरे झाले. याशिवाय, आज ९० रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली. राज्यात दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.
तर, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,०३,३२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.६५ टक्के एवढे झाले आहे. तर, आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,१५,०६३ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३३०३८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.
राज्यात आज रोजी एकूण ७५,३०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशभरात कोरोनाचे 30 हजारांहून अधिक नवे रुग्ण

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 30 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तर 422 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (3 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,549 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 422 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,17,26,507 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,25,195 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,04,958 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,08,96,354 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *