बीड

दुष्काळी मराठवाड्याची परिस्थिती बदलणार:माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मागणीला यश

बीड/प्रतिनिधी

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावे व मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवावा यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत पाठपुरावा केला,मंत्री असतानाच मंत्रिमंडळ बैठकीत ही आग्रहाची मागणी लावून धरली होती,तसेच काही महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर झालेल्या व्ही सी बैठकीत देखील ही मागणी मंजूर करावी असा आग्रह धरला होता तेव्हाच या योजनेला तत्वतः मान्यता देण्यात येऊन यावर अभ्यास गट नेमण्यात आला होता,तेव्हा 18 हजार कोटींचा अंदाजित प्रकल्प खर्च प्रस्तावित होता,आज ही योजना पूर्ण करण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे,माजीमंत्री क्षीरसागर यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे

मराठवाडा हा अवर्षणप्रवण व सातत्याने दुष्काळी प्रदेश आहे मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ पडत असतो यामुळे पाण्याची नैसर्गिक उपलब्धता कमी असते मराठवाड्यासाठी पाण्याची नितांत गरज लक्षात घेऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सातत्याने याप्रकरणी निवेदने देऊन मागणी करत पाठपुरावा केला होता,पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात यावे जेणे करून मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा तसेच शेती लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण होईल,यासाठी तत्कालीन मंत्रिमंडळ बैठकीत ही आग्रही मागणी केली होती तसेच सभागृहात देखील वारंवार याबाबतीत प्रश्न उपस्थित केले होते,काही महिन्यांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील व्ही सी द्वारे झालेल्या बैठकीत हा प्रश्न लावून धरला होता,30 जुलै 2019 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन यावर निर्णय घेण्यात आला होता, कोकणातील नारपार दमणगंगा उल्हास व वैतरणा या खोऱ्यात लगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदीत खोऱ्यातील पुणे गंगापूर वाघाड करंजवन भंडारदरा मुळा कळवा मुकणे भावले त्यादी धरणांच्या पाणलोट खोर्‍यात हे पाणी वळून पुढे हेच पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पोहोचले जाणार आहे तहानलेल्या मराठवाड्यात हा मोठा दिलासा मिळणार आहे कोकणातील लहान-मोठ्या 30 नदी खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी 115 अब्ज घनफूट दुष्काळी मराठवाड्याला देण्यास सरकारने तत्वतः मान्यता दिली होती,राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे, या योजनेद्वारे गोदावरी खोऱ्यातील तूट भरून निघण्यास मदत होणार आहे मागील काही वर्षापासून बंद पडलेली ही योजना आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे या योजनेत 631दलघमी(6 टीएमसी)पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे उर्वरित चारही योजना 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पाठपुरावा केलेल्या या प्रश्नांची सोडवणूक झाल्यास मराठवाड्यातील पुढच्या पिढीला याचा मोठा फायदा होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *