ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

राज्यातील जनतेला लॉकडाऊनमधून दिलासा:आता दुकानांची वेळी रात्री 8 पर्यंत

राज्यातील जनतेला लॉकडाऊनमधून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत असून राज्यातील दुकानं रात्री8 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. ज्या भागात कोरोना रुग्णांची टक्केवारी कमी आहे, त्या भागात हा निर्णय लागू होणार आहे. ज्या भागात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे मात्र निर्बंध कायम राहतील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे

कोरोना (Corona) आणि महापूर (Flood) या दोन्ही प्रश्नांवर जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) यांनी म्हटलं आहे. राज्यात दुकानांना (Shops) रात्री 8 वाजेपर्यंत (8pm) परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यातील जनतेच्या हिताची आपल्याला काळजी असून व्यापाऱ्यांच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सांगली दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

खासगी कार्यालयांनी कामाच्या वेळात बदल करून वेगवेगळ्या वेळेला कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट लावाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या, एकाच वेळी कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

करोना बाधित रुग्णांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येणार असून तसा अध्याधेश आज काढला जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यामुळे दुकानदार आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *