बीड जिल्ह्यात आज 167 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6479 बाधीत
बीड जिल्ह्यात आज दि 2 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3574 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 167 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3407 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 43 बीड 37 धारूर 4 गेवराई 10 केज 18 माजलगाव 10 परळी 1 पाटोदा 21 शिरूर 18 वडवणी 8 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात ६ हजार ४७९ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई: आज राज्यात ६ हजार ४७९ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तर, ४ हजार ११० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. (Coronavirus in maharashtra)
राज्यात करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या सहा ते सात हजारांच्या घरात आहे. त्यामुळं रुग्णसंख्या स्थिर आहे. मात्र, करोना रुग्णांच्या मृतांची संख्या मात्र अजूनही चिंताजनक आहे.
आज दिवसभर राज्यात ६ हजार ४७९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३ लाख १० हजार १९४ इतकी झाली आहे. तर, १५७ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ४,६७,९८६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,११७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज करोनामुक्त रुग्णांपेक्षा करोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासांत ४ हजार ११० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ९४ हजार ८९६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६. ५९ टक्के इतके झाले आहे.
राज्यात सध्या ७८ हजार ९६२ अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)