बीड

बीड जिल्ह्यात आज 200 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 6959 बाधीत

बीड जिल्ह्यात आज दि 1 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5364 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 200 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5164 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 2 आष्टी 48 बीड 52 धारूर 9 गेवराई 9 केज 9 माजलगाव 8 पाटोदा 24 शिरूर 30 वडवणी 8 असे रुग्ण आढळून आले आहेत

२४ तासांत राज्यात ६ हजार ९५९ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई: राज्यात करोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढउतार सुरूच असून आज रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार ९५९ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे.(coronavirus in maharashtra updates)
या बरोबरच आज एकूण ७ हजार ४६७ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण २२५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या २२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्क्यांवर स्थिरावला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ९० हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६२ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७६ हजार ७५५ इतकी आहे.

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *